ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना महामारीच्या संकटामुळे गुरुवारी इंडिया ओपन आणि सैयद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट रद्द करण्यात आली. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असलेल्या या दोन्ही टूर्नामेंट रद्द करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया ओपन बॅडमिंटन टूर्नामेंटचे आयोजन 8 ते 13 डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते. तर सैयद मोदी इंटरनॅशनल टूर्नामेंट लखनऊ मध्ये 17 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत होणार होती.
याआधी इंडिया ओपन टूर्नामेंट 24 ते 29 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये होणार होती मात्र, कोरोनामुळे याला स्थगिती देण्यात आली होती.