मंगळवारी 12 नवे रुग्ण तर 10 जणांनी केली कोरोनावर मात
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण काहीसे वाढले आहे. जिल्हय़ात मंगळवारी तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर नवे 12 रुग्ण आढळले असून 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
कोरोना अजूनही सक्रिय आहे. त्यामुळे प्रत्येकानेच कोरोनाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहे. आतापर्यंत 930 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या 192 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत 79 हजार 738 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामधील 78 हजार 616 जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हय़ामध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे ही दिलासादायक बाब आहे. असे असले तरी कोरोना अजूनही असून प्रत्येकानेच नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.