ऑनलाईन टीम / इंग्लंड :
इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य आणि लिड्स युनायटेड क्लबचे फुटबॉलपटू नॉर्मन हंटर यांचे आज निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हंटर यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचार चालू होते मात्र, उपचारा दरम्यान आज त्यांचे निधन झाले.
29 ऑक्टोबर 1943 मध्ये त्यांचा जन्म झाला. हंटर यांनी 1964 – 65 मध्ये इंग्लंडच्या 23 वर्षाखालील आणि 1965 ते 1974 या काळात इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले होते. हंटर हे वर्ल्ड कप संघाचे सदस्य देखील होते. मात्र, त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
हंटर यांनी 1962 ते 1976 या काळात लिड्स क्लबसाठी त्यांनी 726 सामने खेळले. यामध्ये त्यांनी लिड्स क्लबला दोनवेळा जेतेपद मिळवून दिले. त्यानंतर 1976 ते 1979 या काळात ब्रिस्टल सिटी क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी 1980 ते 1990 मध्ये ते संघाचे व्यवस्थापक होते.