रविवारी 30 नवे रुग्ण : 13 जणांनी केली कोरोनावर मात
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 24 तासांत एका महिलेसह चौघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये एका बेळगाव तालुक्मयातील तिघा जणांचा समावेश आहे तर रविवारी कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळून आले असून बरे झालेल्या 13 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांमधून घरी पाठविण्यात आले आहे.
कंकणवाडी, रामतीर्थनगर, राणी चन्नम्मानगर, टिळकवाडी, नाझर कॅम्प-वडगाव, उज्ज्वलनगर, वीरभद्रनगर, समृद्धी कॉलनी, वड्डर छावणी, भाग्यनगर, शेडबाळ, मोळे, रायबाग, मेळवंकी, केंपट्टी, नरसिंगपूर, शिंदीकुरबेट, मल्लापूर पी. जी., सौंदलगा, यद्दलगुड परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 79 हजार 625 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 78 हजार 400 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 314 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 911 इतका आहे. राज्यातील बाधितांची संख्या कमी होत असली तरी बेळगावात हळूहळू त्यात वाढ होत असल्याचे दिसून येते.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बेळगाव तालुक्मयातील 56 वषीय महिला, 83 वषीय वृद्ध, 65 वषीय वृद्ध व बैलहोंगल तालुक्मयातील 76 वषीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी एका बेळगाव शहर व उपनगरात कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
अद्याप 4027 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. तर जिल्हय़ातील 54 हजार 29 हून अधिकजण चौदा दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत जिल्हय़ातील 13 लाख 25 हजार 933 जणांची स्वॅब तपासणी झाली असून त्यापैकी 12 लाख 37 हजार 511 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.