कॅनबरा
कोरोना विषाणूवर आजही जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये रात्रंदिवस संशोधन सुरु आहे. यामध्ये दिवसागणिक विविध टप्प्यावर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. एका अभ्यासानुसार संशोधकांनी दावा केला आहे, की कोविड-19मुळे मृत्यू होण्यास आणखीन चार प्रमुख आजारही (कॉमोर्बिडिटीज) मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याचे समोर आल्याचा दावा केला आहे. यामध्ये कर्करोग, किडनी आजार, डायबेटीज (मधुमेह) आणि हायपरटेंशन यांचाही समावेश राहिल्याचे समोर आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ विद्यापीठातील संशोधकांनी यासंदर्भात संशोधन करुन असा दावा केला आहे. सदरचा निष्कर्ष नोंदवण्यासाठी उपलब्ध माहितीनुसार जवळपास 14 देशातील 3,75,859 जणांचा जागतिक पातळीवरील डाटा एकत्रित करुन माहितीचे विश्लेषण करण्यात आल्यानंतर हा अहवाल मांडला आहे. यामध्ये सांख्यिकी पातळी लक्षात घेतल्यास किडनी संदर्भातील जुने आजार, मधुमेह व लठ्ठपणा अन्य आजारही कोरोनामुळे मृत्यू होण्यास कारणीभुत ठरल्याची नोंद केली आहे.