ऑनलाईन टीम / लंडन :
कोरोना विषाणू थेट माणसाच्या मेंदूवर हल्ला करत असल्याचा दावा लंडनस्थित संशोधकांनी केला आहे. तसेच कोरोनामुळे मेंदूशी संबंधित नवीन आजाराची लाट येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचा आभ्यास केला. यामध्ये 43 कोरोना रूग्णांना मज्जातंतूच्या आणि मेंदूच्या आजारांचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले. कोरोनामुळे मेंदूलाही गंभीर इजा होण्याचा धोका आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेला हा धोका 1920 आणि 1930 मध्ये आलेल्या महासाथीच्या आजारानंतर निर्माण झालेल्या धोक्यासारखा आहे, त्यामुळे याच्यावर संशोधन सुरू आहे. कोरोना विषाणू माणसाच्या फुफ्फुसावर हल्ला करत असल्याने रुग्णांना श्वसनाचा त्रास होत होता. आता मेंदूवरही या विषाणूचा परिणाम होत असल्याने चिंता वाढल्याचे यूसीएलचे संशोधक मायकल झांडी यांनी सांगितले.