64 वर्षांच्या काळात प्रथमच पडणार खंड
स्टॉकहोम / वृत्तसंस्था
जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे यावषी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 64 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच या सोहळय़ात खंड पडणार आहे. हा पुरस्कार सोहळा दरवर्षीपेक्षा वेगळय़ा पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून त्याची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नोबेल पुरस्कारांचे आयोजन करणाऱया संस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
दरवषी डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात (नोबेल विक) नोबेल पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत दरवषी त्या वर्षातील नोबेल पुरस्कार विजेत्यांना स्टॉकहोममध्ये आमंत्रित केले जाते. स्टॉकहोमच्या सिटी हॉलमध्ये आयोजित या सोहळय़ात विजेत्यांसाठी स्वीडिश राजघराण्यासोबत भोजनाचेदेखील आयोजन केले जाते.
कोरोनाच्या महामारीमुळे ‘नोबेल आठवडा’ ज्याप्रकारे आयोजित करण्यात येतो तसा यावेळी करण्यात येणार नाही. सध्या यावेळची परिस्थिती वेगळी आहे. हे वर्ष गेल्या वषीच्या तुलनेत वेगळे आहे. सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज असल्यामुळे यावषीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल, अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली.