नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
कोरोना संकटामुळे यंदाही हज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हज समिती ऑफ इंडियाने हज यात्रेसाठीचे यंदाचे सर्व अर्ज रद्द केले आहेत.
सौदी अरेबियाने केवळ नागरिकांना आणि रहिवाशांना मर्यादित संख्येने हज 2021 ला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे की, कोरोनाव्हायरस सर्व देशभर पसरलेल्या स्थितीमुळे सौदी अरेबियाने देशातील नागरिकांना आणि रहिवाशांना मर्यादित संख्येने हज 2021 ला जाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय हज यात्रा रद्द करण्यात आल्याचं सागण्यात आलं आहे. त्यामुळे हज 2021 चे सर्व अर्ज रद्द करण्याचा निर्णय हज समिती ऑफ इंडियाने घेतला आहे. आता मुस्लिम समाजातील लोकांना हजसाठी एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.