ऑनलाईन टिम / नवी दिल्ली :
संघ लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी पूर्वपरीक्षा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली संघ लोकसेवा आयोगाची आज बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यूपीएससीच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन वाढवण्यात आला आहे त्यामुळे अशा संकटाच्या स्थितीत परिक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे 20 मे नंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल.
तसेच पूर्वपरीक्षेत कोणतेही नवीन बदल करण्यात आले नाहीत मात्र, देशातील परिस्थितीचे मूल्यांकन करून परिक्षेच्या नवीन तारखा कळवल्या जातील.
दरम्यान सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अनेक परिक्षा केंद्रांचे रूपांतर विलगीकरण कक्षात करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये तसेच अजून विद्यार्थ्यांना या संकटामुळे परिक्षेचे हॉल तिकीट देखील दिलेले नसल्याने ही परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.