गुरुवारी 41 नवे रुग्ण
बेळगाव : गेल्या 24 तासात कोरोनामुळे एका वृद्धेसह तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर जिल्हय़ात 41 नवे रुग्ण आढळून आले असून 61 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृतांचा सरकारी आकडा 870 वर पोहोचला आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 78 हजार 414 पोहोचला आहे. आतापर्यंत 77 हजार 48 जणांनी कोरोनावर मात केली असून 496 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. बेळगाव व चिकोडी तालुक्मयातील रुग्णसंख्या वाढत आहे. सौंदत्ती तालुक्मयातील 32 वषीय युवक, रायबाग तालुक्मयातील 54 वषीय रहिवासी व 75 वषीय वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर गणेशपूर, जयनगर, काळीआमराई, शास्त्राrनगर, राणी चन्नम्मानगर, मंडोळी रोड, शिंदोळी, टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.