12 टक्के बंदच: फिक्की, इंडियन एंजल नेटवर्कचा अहवाल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविड 19 च्या फैलावामुळे जगासोबत देशातील विविध उद्योग व्यवसाय प्रभावीत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामध्ये मोठय़ा व्यवसायाऐवजी लहान व्यवसायांना मोठा फटका बसला असून यात देशातील स्टार्टअप्स अधिक प्रमाणात प्रभावीत झाल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास देशामधील 70 टक्के स्टार्टअपमधील व्यवसाय प्रभावित झाले असल्याची माहिती फिक्की आणि इंडियन एंजल नेटवर्क यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून देण्यात आली आहे. एकंदर परिस्थिती पाहता अशा उद्योगांना आवश्यक सवलतीचे पॅकेज, करात सवलत तातडीने मिळण्याची गरज व्यक्त होत आहे. आर्थिक सहकार्य, अनुदान, कर्ज अशा गोष्टींची तातडीने पूर्तता करण्याची खरी गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे.
व्यवसायात निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणातून स्टार्टअप्सना बाहेर काढण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. भारतीय स्टार्टअपवर कोविड 19 चा प्रभाव या विषयाला अनुसरून एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षणात जवळपास 250 स्टार्टअप्सचा समावेश करण्यात आला होता.
एकूण स्टार्टअपमधून 12 टक्के स्टार्टअप्स बंद पडले आहेत तर यातील 22 टक्के स्टार्टअप्सकडे आपला खर्च करण्यासाठीची रक्कम शिल्लक आहे. 68 टक्के स्टार्टअप्सनी आपल्या अधिकच्या खर्चात कपात केली आहे. यातील 30 टक्के कंपन्यांनी बंदचा कालावधी वाढल्यास कर्मचारी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. यासोबत अन्य स्टार्टअप कंपन्या येणाऱया काळात परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे.
गुंतवणूक घटण्याचे संकेत
स्टार्टअप्सपुढे संकटाचे ढग असल्याने येणाऱया काळात यातील गुंतवणूक अडणार असल्याचे बोलले जात आहे. 33 टक्केपेक्षा अधिक स्टार्टअपने मिळणारी गुंतवणूक थांबणार किंवा उशिराने होणार असल्याचे म्हटले आहे.
आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतवणूक शक्मय
सर्वेक्षणाच्या माहितीमधून बांधण्यात आलेल्या निष्कर्षानुसार कोविड 19 च्या अगोदर आणि त्याच्यानंतर प्राथमिकता असणाऱया क्षेत्रातील गुंतवणुकीपेक्षा 35 टक्के गुंतवणूक आरोग्य सेवा स्टार्टअपमध्ये करण्यात आल्याचे पहावयास मिळाले आहे. यानंतर एडटेक, फिनटेक आणि ऍग्री या क्षेत्रांचा यात समावेश होतो.