ऑनलाईन टीम/तरुण भारत
जगभरात कोरोनाबाधितांची संख्या अजूनही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच ओमिक्रॉनच्या बाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वपूर्ण घोषणा केली असून करोनावरील उपचारांसाठी नव्या औषधाला मान्यता देण्यात आली आहे. एलि लिली आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाईन यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या बारिसिटिनिब या औषधाला WHO नं मान्यता दिली आहे. ओल्युमियांट या नावाने हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार असून जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधाची शिफारस केली आहे.
जगात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत असताना ही आनंदाची बातमी समोर आली आहे. डब्ल्यूएचओचा अंदाज आहे की मार्चपर्यंत निम्मे युरोप संक्रमित होईल. डब्ल्यूएचओ तज्ञांनी सांगितले की कॉर्टिकोस्टिरॉईड्ससह वापरले जाणारे संधिवात औषध बॅरिसिटिनिब गंभीर किंवा गंभीर कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. या औषधांमुळे रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढली असून बाधितांसाठी व्हेंटिलेटरची गरज कमी झाली आहे.