ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एचआयव्हीवरील दोन औषधांचा कोरोना विषाणूसंसर्गावर मर्यादित प्रमाणात वापर करण्यास भारतीय औषध महानिरीक्षकांनी परवानगी दिली आहे.
लोपिनवीर व रिटोनवीर अशी एचआयव्हीवरील दोन औषधे आहेत. या औषधांचा वापर श्वसनाच्या रोगांसाठीही होतो. कोरोना या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग झाल्यास न्युमोनिया होतो. त्यामुळे श्वसनाच्या रोगांवर चालणारी ही एचआयव्हीवरील दोन्ही औषधे मर्यादीत प्रमाणात कोरोना रुग्णांना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाने चीनमध्ये आतापर्यंत 722 लोकांचे बळी घेतले आहेत. तर 31 हजार लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ यावर लस शोधण्यात व्यस्त आहेत. अमेरिकेत इबोलावर तयार केलेले औषध गुणकारी ठरले आहे. रेमडेसीवीर व क्लोरोक्विन या दोन औषधांचाही चीनमधील लोकांना फरक पडल्याचे सांगण्यात येते.