ऑनलाईन टीम तरुण भारत
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी कोरबीव्हॅक्स आणि कोव्होव्हॅक्स लस आणि अँटी-व्हायरल औषध मोल्नुपिरावीरला मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्होव्हॅक्स या कोरोना लशीचा मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली होती. त्यामुळे आता कोरोनाविरोधातील लढाईत आणखी दोन लशींची आणि एका औषधाची भर पडली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘CORBEVAX लस ही भारतातील पहिली स्वदेशी ‘RBD प्रोटीन सब-युनिट’ ही लस भारतात विकसित करण्या आलेली ही तिसरी लस असून हैदराबादस्थित बायोलॉजिकल-ईने याची निर्मिती केली आहे. याशिवाय सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे नॅनोपार्टिकल लस, COVOVAX ची निर्मिती करणार असून, अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीरची निर्मिती आता देशातील 13 कंपन्या करणार आहेत.