ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनावर ‘डायएबीझेडआय’ हे औषध प्रभावी असून, त्याचा एकच डोस रुग्णाला पुरेसा असल्याचा दावा अमेरिकन शास्त्रज्ञांनी केला आहे.
‘सायन्स इम्युनोलॉजी जर्नल’मध्ये अमेरिकन शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक औषधांचे परीक्षण केले. त्यामध्ये ‘डायएबीझेडआय’ हे औषध प्रभावी असल्याचे दिसून आले. हे औषध शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमतेला सक्रिय करते. तसेच व्हायरसला गंभीर स्वरूपात जाण्यापासून रोखते. श्वसनासंबंधी उपचारासाठीही हे फायदेशीर आहे.
जगभरातील इतर कोरोना औषधांपेक्षा हे अधिक प्रभावी असून, त्याचा एकच डोस पुरेसा असल्याचे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.