प्रादेशिक आयुक्तांचा पुढाकार : बिम्सवर नेमला नोडल अधिकारी : चेकपोस्टवर वेब कॅमेरे लावण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रोखण्यासाठी जिल्हय़ात युद्धपातळीवर प्रभावी उपाययोजना राबविण्याचे ठरविण्यात आले. प्रादेशिक आयुक्त आदित्य आमलान बिस्वास यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकाऱयांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून स्वॅब तपासणी अहवाल त्वरित देण्याबरोबरच बाधितांवर उपचार करणे, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे व नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यांचे निवारण करणे आदी कामे हाती घेण्याची सूचना प्रादेशिक आयुक्तांनी दिली आहे.
जिल्हय़ात कोरोनावर नियंत्रण व बाधितांवर उत्तम उपचार होण्यासंदर्भात वरि÷ अधिकाऱयांची बैठक घेऊन प्रादेशिक आयुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेतला. येथील बिम्स (सरकारी वैद्यकीय महाविद्यालय) आणि एनआयटीएम प्रयोगशाळेत सातत्याने
स्वॅब तपासणी सुरू आहे. त्वरित अहवाल देण्याबरोबरच तपासणीची गुणवत्ता राखण्याची गरज आहे. यासाठी अधिकाऱयांनी उपाययोजना राबविण्याची सूचना देण्यात आली.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, आयसीएमआर-एनआयटीएमचे संचालक डॉ. चट्टोपाध्याय, पालिका आयुक्त जगदीश के. एच., प्रांताधिकारी अशोक तेली, शशीधर बगली, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. बालकृष्ण तुक्कार, आरसीएच डॉ. आय. पी. गडाद, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, साहाय्यक औषध नियंत्रक रघुराम, डॉ. एम. एस. पल्लेद आदी उपस्थित होते. कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्वरित त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. लवकरात लवकर तपासणी अहवाल मिळावा. अन्य ठिकाणाहून किंवा परराज्यांतून आलेल्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात यावी, असे निर्णय बैठकीत घेण्यात आले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन बाधितांवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी सर्व खासगी इस्पितळात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा व बेडची माहिती जमवून ठेवावी. गरज पडल्यास राज्य सरकारच्या मार्गसूचीनुसार खासगी इस्पितळांतील बेडचा वापर करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.
गरजेनुसार बाधितांना बेड मंजूर करावेत
बाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी खासगी इस्पितळांतील बेडची संख्या किती आहे, याची वेगळय़ा सॉफ्टवेअरमध्ये माहिती ठेवावी. गरजेनुसार बाधितांना बेड मंजूर करावेत. जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली बेड वाटपासाठी समिती नेमण्याचे ठरविण्यात आले असून सरकारच्या मार्गसूचीनुसार सीमेवर काटेकोर खबरदारी बाळगावी. वाहनांची तपासणी करावी, या प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी चेकपोस्टवर वेब कॅमेरे लावावेत व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तेथील परिस्थितीवर नजर ठेवण्याची सूचना प्रादेशिक आयुक्तांनी अधिकाऱयांना केली आहे.
पोलीस दलानेही सरकारी मार्गसूचनेनुसार निर्बंधाची आणखी कडक अंमलबजावणी करण्याची सूचना देण्यात आली. कोरोना बाधितांवर उपचार व या संबंधीच्या सेवा पुरविण्यास दिरंगाई करणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. उपचारासाठी आवश्यक आर्थिक तरतूद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
अधिकाऱयांनी अनुदानाची कमतरता, कर्मचाऱयांची कमतरता अशी कारणे सांगत बसू नये. जर समस्या असतील तर त्या जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. बिम्स व आयसीएमआर-एनआयईएम या दोन्ही प्रयोगशाळांनी दैनंदिन स्वॅब तपासणीची क्षमता वाढवून वेळेत अहवाल द्यावा, अशी सूचना करण्यात आली. जिल्हा व तालुका कंट्रोल रुमच्या समन्वयातून प्रत्येकाने काम करावे. ऑक्सिजनचा साठा, त्याची उपलब्धता ही औषध नियंत्रकांची जबाबदारी आहे. ऑक्सिजन आणि औषधांची उपलब्धता कमी पडू नये यासाठी औषध नियंत्रकांनी आवश्यक उपाययोजना करावी. सरकार पातळीवर कसल्याही प्रकारच्या मदतीची गरज असेल तर त्वरित ते जिल्हाधिकाऱयांच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी सूचना अधिकाऱयांना करण्यात आली.