सुब्रमण्यम स्वामी यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिला आहे. पंतप्रधानांनी कोविडविरोधी लढाईची धुरा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे सोपवावी असे स्वामी यांनी ट्विटरवर लिहिलेल्या पोस्टमध्ये नमूद पेले आहे.
कोरोना संकट हाताळण्यास पायाभूत संरचनेची गरज असून गडकरींनी याप्रकरणी स्वतःला सिद्ध करून दाखविले असल्याचे उद्गार स्वामी यांनी काढले आहेत.
भारत युद्ध जिंकणार
भारत या महामारीशी सुरू असलेल्या लढाईत जिंकणार आहे. यापूर्वी भारताने मुघल आणि ब्रिटिश घुसखोरांच्या विरोधात विजय मिळविला होता. कोरोना संकटात कठोर पावले उचलली न गेल्यास आम्हाला तिसऱया लाटेलाही तोंड द्यावे लागू शकते. अशा स्थितीत मुलांवर अधिक परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीव मोदींनी कोरोनाविरोधी लढय़ाची धुरा गडकरींच्या हाती सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर भरवसा ठेवणे निरर्थक असल्याचे स्वामी म्हणाले.
पीएमओवर टीका
मी पंतप्रधान कार्यालयावर टीका केली आहे. हा विभाग म्हणजे पंतप्रधान नव्हेत असे स्पष्टीकरणही स्वामी यांनी दिले आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने स्वामी यांनी आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना पदावरून हटवावे का असे विचारले असता त्यांनी नको असे उत्तर दिले आहे. हर्षवर्धन अत्यंत विनम्र असल्याने अधिकाऱयांशी कठोरपणे बोलू शकत नाहीत. गडकरींसोबत ते अधिक चांगले काम करू शकतील असे उद्गार स्वामी यांनी काढले आहेत.