आमदार बाबुश मोन्सेरात यांचे विपेत्यांना आवाहन
प्रतिनिधी / पणजी
दुकाने बाजार सुरु झाला असला तरी सर्व दुकानदारांनी तसेच ग्राहकांनी कोरोना विषयी दिलेल्या सर्व सुचनाचे पालन करावे. सामान खरेदी करताना समाजिक अंतराचे भान ठेवा तसेच तोंडाला मास्क व सेनिटायझर वापर करावा, असे आवाहन पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी केले. काल आमदार बाबुश मोन्सरात पणजी महानगर पालीकेचे महापौर उदय मडकईकर नगरसेवक शुभम चोडणकर दिक्षा माईणकर तसेच अन्य नगरसेवकांनी पणजी मार्केटमधील भाजी विक्रत्यांना मास्क व सेनिटाईझरचा वाटप केले. यावेळी त्यांना कोरोना विषयीचा सुचनांचे पालक करायला सांगितले.
आम्ही पणजी सर्व दुकानदारा सोबत आहे. सध्याचा काळ हा खूपच कठीण आहे त्यामुळे सर्व आपल्या परीने काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी आमचे आरोग्य कर्मचारी पोलिस चांगल्या तरेने काम करत आहे. आम्हाला त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहक तसेच दुकानदारांनी कोरोना विषयी जागृत होता नियमांचे पालन करावे. विक्रेत हे सुशिक्षित असून त्यांना दिलेले आदेश ते पालन करतात त्यामुळे कुणाचाच धंदा व्यावसाय बूडू नये. यासाठी आम्ही सर्व स्थानिक व्यवसायिकांना धंदा कारायला परवानगी दिली आहे. सर्वानी प्रशासनाला सहकार्य करावे, असे यावेळी आमदार बाबुश मोन्सेरात यांनी सांगितले.
हे मोठे आर्थिक संकट
सध्याकोरोनामुळे सर्वत्र आर्थिक संकट कोसळले आहे. सर्व धंदे व्यवसाय नुकसानित गेले आहे अशा काळात सर्वांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने पर्यटन व्यावसाय पूर्णपणे कोलमोडला आहे. पर्यटन हा गोव्याचा अर्थिक कणा आहे. त्यामुळे हा आमच्यासाठी कठीण काळ आहे. आम्हाला पुन्हा यातुन सावरायला हवे यासाठी आम्ही आरोग्य अधाकारी डॉक्टरांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे. कोरोना पुन्हा पसरु नये याची काळजी घेतली पाहिजे, असे यावेळी मोन्सेरात यांनी सांगितले. सध्या सरकारने सर्व दुकाने खुली केली असली तरी आम्ही गरजेशिवाय फिरु नये. अर्जट कामासाठी बाहेर गेले पाहिजे असेही ते म्हणाले.
पावसाळी पूर्व कामाची तयारी सरु
पणजी शहरातील पावसाळी पूर्व कामाची तयारी सुरु करण्यात आली आहे गेली 25 वर्षे साफ केली नसलेली गटारे साफ करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पणी साचते sअशा ठिकाणी पाहणी करुन ते काम सुरु आहे. पावसाळय़ात शहरात कुठेच पुर येऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. तसेच पावसाळय़ात डेंग्यूचा फैलाव शहरात होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. जे लोक सांडपाणी नाल्यात सोडतात त्यांची पाईपलाईन बंद करण्यात आली आहे, असेही यावेळी आमदार मोन्सेरात यांनी rसांगितले.