कोरोना कोविद 19 हा विषाणू असंख्य प्रकारे मानवाच्या शरीरात प्रवेश करु शकतो. त्यामुळेच अनेक गोष्टींबाबत काळजी घेणे क्रमप्राप्त ठरत आहे.
आपण रोजचे दूध, ब्रेड किंवा अन्य कोणतेही सामान खरेदी करत असाल तर कपडय़ाची पिशवी बाळगा. यापासून बाधा होण्याची शक्यता कमी राहते.
- बाहेरून येणारे सीलबंद पाकिटे साबणाने धुवावीत. याशिवाय बाहेरून आणलेले सामान 8 ते दहा तास बाहेर ठेवावे. त्यामुळे व्हायरस आपोआप नष्ट होईल.
- बाहेरुन येणार्या लोकांचे कपडे धुतले पाहिजे. कपडे धुण्यास काही अडचणी येत असतील तर उन्हात ठेवायला हवे.
- फळे आणि भाज्या गरम पाण्याने धुतल्यानंतरच वापरावेत. शक्य नसल्यास पाण्यात मीठ घालून किंवा तुरटीच्या पाण्याने धुवून मगच भाज्या वापराव्यात.
- जास्त जुना भाजीपाला वापरु नका आणि खरेदीही करु नका.