ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडातील कोरोनाबाधितांनी 93 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. प्रदेशात मागील 24 तासात 269 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 07 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 93 हजार 111 इतकी झाली आहे. सद्य स्थितीत 3, 179 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 13,790 नमुने निगेटिव्ह आले. तर देहरादून मध्ये सर्वात जास्त म्हणजेच 90 नवे रुग्ण आढळून आले. नैनिताल 58, अल्मोडा 14, बागेश्वर 03, चमोली 7 चंपावत 7, हरिद्वार 31, पौडी गडवाल 7, पिथौरागड 13, रुद्रप्रयाग 07, टिहरी 6, उधमसिंह नगर 19 आणि उत्तरकाशीमध्ये 7 नव्या रुग्णांची भर पडली.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1562 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 87,127 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.