ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. मगील 24 तासात 468 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 05 जणांनी आपला जीव गमावला आहे. देहरादून आणि नैनितालमध्ये रोजच्या रोज रुग्ण संख्या वाढण्याचे अधिक आहे. त्यामुळे प्रदेशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 88,844 वर पोहोचली आहे. सद्य स्थितीत 5,510 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 14,239 नमुने निगेटिव्ह आले. तर देहरादून मध्ये सर्वात जास्त म्हणजेच 160 नवे रुग्ण आढळून आले. अल्मोडा 02, बागेश्वर 05, चमोली 10, चंपावत 18, हरिद्वार 26, नैनिताल 110, पौडी गडवाल 21, पिथौरागड 52, रुद्रप्रयाग 12, टिहरी 23, उधमसिंह नगर 23 आणि उत्तरकाशीमध्ये 24 नव्या रुग्णांची भर पडली.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1463 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 271 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 80,738 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.