ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
गोवा सरकारने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘आयवरमेक्टिन’ या औषधाला परवानगी दिली. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी या औषधाच्या वापराबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोणतेही औषध नवीन लक्षणांसाठी वापरण्याआधी त्याची सुरक्षितता आणि क्षमता जाणून घेणे महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही चाचण्याशिवाय कोरोना उपचारासाठी आयवरमेक्टिन वापरण्यास परवानगी देत नाही.
अमेरिकेत हे औषध STROMECTOL नावाने मिळते. या औषधांचे अनेक साईड इफेक्ट असल्याचा दावा केला जातो. मागील 2 महिन्यापासून WHO ने दुसऱ्यांदा ‘आयवरमेक्टिन’ औषधाच्या वापरावरून धोक्याचा इशारा दिला आहे.