बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकने सोमवारी एकूण एका लाख कोरोना बाधितांचा टप्पा गाठला. कर्नाटक कोरोना रुग्ण संख्येमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि आंध्र प्रदेशच्या तुलनेत देशात पाचव्या स्थानी आहे.
तथापि, कर्नाटकपेक्षा ३ लाख अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र कर्नाटकचा सक्रिय रुग्णाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो.
कोरोनावाच्या एकूण संख्येच्या प्रमाणांकडे पाहता कर्नाटकमध्ये एकूण कोरोना रूग्णांपैकी ६० टक्के रुग्ण उपचारात आहेत. महाराष्ट्रात ३६ टक्के प्रकरणे कार्यरत आहेत. राष्ट्रीय पातळीवर, सर्व प्रकरणांपैकी ३३ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत.