वार्ताहर/पाटगाव
शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणात सहभागी होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून परीपत्र सादर करण्यात आले आहे. राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. या काळात विविध शहरात अडकून पटलेल्या मजुरांची शाळेची व्यवस्था, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, चेक पोस्टवर ड्युटी तसेच कोविड सेंटरवर नेमणूक करणे अशी कामे शिक्षकांना देण्यात आली होती. त्याची आता या कामातून मुक्तता करण्याचे आदेश 17 ऑगस्ट 2020 च्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांना आता ऑनलाइन शिकवण्यावर लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या कामात व्यस्त असलेल्या शिक्षकांना त्यातून मुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारने 24 जून रोजी दिले होते. त्यानंतरही ही स्थानिक स्तरावर शिक्षकांना पुन्हा कोरोनाच्या कामासाठी बोलावून घेतले आहे. राज्य शासनाने काढलेल्या काढलेल्या देशाच्या आधारित या कामातून कार्यमुक्त होण्यासाठी शिक्षक संघटनेने मागणी केली होती. पण त्यांना स्पष्ट नकार देण्यात येत होता. त्यामुळे शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना घराघरात शिक्षण पोहोचवणे गरजेचे असताना या कामात अडकलेल्या शिक्षकांना अध्यापनात अडचण निर्माण होत होती. त्यांचा कार्यभार दुसऱ्या शिक्षकांच्याकडे दिला होता. त्यामुळे प्रत्येक वर्गाकडे ऑनलाईन लक्ष ठेवणे शिक्षकांना शक्य होत नव्हते. यावर शिक्षण विभागाने ज्या शिक्षकांची सेवा कोविड आजार संबंधित कामकाजासाठी अधिग्रहित करण्यात आली होती त्याअनुषंगाने त्यांना कार्यमुक्त करावे असा शासन आदेश करण्यात आला असून या संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून कार्यमुक्त करण्याची कारवाई करावी अन्य आस्थापनेवर समावेशित सरप्लस असलेल्या शिक्षकांनाही ही मूळ ठिकाणच्या शाळेत बोलवून ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत त्याचा उपयोग करून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.