काही समभागांनी दिला 17 टक्के परतावा : 30 जून रोजी 5.27 लाख कोटी भांडवल जमा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेअर बाजारातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूक करणारी कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा (एलआयसी) वित्त वर्षातील पहिल्या तिमाहीतील कमाईचा आकडा समाधानकारक राहिला आहे. याच दरम्यान कंपनीच्या इक्विटी पोर्टफोलियोमध्ये 23 टक्क्मयांची उसळी दिसून आली आहे.
कोरोना संकटात अन्य कंपन्या आर्थिक अडचणीचा सामना करत असताना एलआयसीने पोर्टफोलियोमध्ये समावेश असणाऱया कंपन्यांचे बाजारातील भांडवल 30 जून रोजी 5.27 लाख कोटींच्या घरात पोहोचले होते. जे 31 मार्च रोजी 4.30 लाख कोटी होते. म्हणजे चालू 3 महिन्यात एलआयसीने जवळपास 97400 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
इक्विटीकडे असणाऱया आकडय़ाच्या आधारे एलआयसीने वेगाने नफा करत असताना मागील तिमाहीत कंपनीने बहुतांश समभागांवर दावा केला आहे. यामध्ये बिर्ला टायर्सचे समभाग 17 टक्क्मयांनी म्हणजे 1603 ने वधारले. एलआयसीने पोर्टफोलियोच्या टक्केवारीच्या हिशोबाने या समभागाने सर्वाधिक उंची प्राप्त केली आहे. 31 मार्च रोजी याची किमत 2.93 रुपये होती जी 30 जून रोजी 50.25 रुपयांवर गेली. अलोक इंडस्ट्रीज 1255 टक्के, डिग्जॅम 283 टक्के, रिलायन्स होम फायनान्स 275 टक्के यांनीही एलआयसीला मोठा परतावा दिला आहे.
अन्य कंपन्यांचा समावेश
रिलायन्स पॉवर, कॉक्स ऍण्ड किंग्स, बल्लारपूर इंडस्ट्रीज, जेपी इन्फ्राटेक, जीटीएल इन्फ्रा, रिलायन्स कॅपिटल, बजाज हिंदुस्थान आणि सुजलॉन एनर्जीने मागील तिमाहीत 100 टक्केपेक्षा अधिकची झेप घेतली आहे.