जवळपास खरेदीत 51 टक्क्मयांची वाढ : सर्व्हेमधून माहिती सादर: दसऱयाआधी सेल सुरू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होण्यास काही कालावधीच राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गातून याची मोठय़ा प्रमाणात पूर्वतयारी करण्यात येत असल्याचे पहावयास मिळत आहे. कोरोनाचा प्रभाव अद्यापही असल्याने अनेकांचा खरेदीतला कल हा ऑनलाइनच अधिक दिसतोय. याचाच परिणाम म्हणून ऑनलाईन खरेदीमध्ये या संकटकाळात जवळपास 51 टक्क्मयांनी तेजी आल्याची माहिती एका सर्व्हेमधून नुकतीच देण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा देशातील 330 जिल्हय़ांमधील तीन लाखापेक्षा अधिक लोकांच्या सहभागातून पूर्ण केला असल्याची माहिती आहे.
सन 2019 मध्ये झालेल्या स्थानिक सर्कलमध्ये ग्राहकांची ऑनलाईन संख्या ही 27 टक्के होती. यातही प्राथमिक प्राधान्यक्रम हा ऑनलाईन खरेदीकडे राहिल्याची नेंद केली आहे. या तुलनेत सामाजिक वातावरणातील बदलाचा विचार करता, ऑनलाईनच्या माध्यमातून विविध क्षेत्रांना प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे.
ई कॉमर्सकडे ओढा
वर्ष 2020 मधील सणासुदीच्या वातावरणात स्थानिक पातळीवरील एका सर्वेक्षणानुसार मोठय़ा प्रमाणात ऑनलाईन खरेदी-विक्री वेगाने वाढत गेली आहे.
सदरची खरेदी विक्री ई कॉमर्सच्या विविध साईट्सचा वापर करुन केली आहे. याच्यासह लघु, मध्यम व कुटीर उद्योगामधील खरेदीचा विचार केल्यास जवळपास80 टक्के लोकांनी ऑनलाईन मार्ग स्विकारला आहे.
ऍमेझॉनचा सेल 17 ऑक्टोबरपासून
नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी ऍमेझॉन इंडियाचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिवल’ सेल 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दुसरीकडे फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डे’ या सेलची सुरुवात 16 ऑक्टोबरला होणार आहे. पण ऍमेझॉनच्या प्राईम सदस्यांना मात्र ऍमेझॉनवर 16 ऑक्टोबरपासूनच उत्सवात भाग घेत आवडत्या वस्तुंची सवलतीत खरेदी करता येणार असल्याचे स्पष्टीकरण ऍमेझॉनने दिले आहे. या सेल दरम्यान 6.5 लाखहून अधिक विपेते आपली उत्पादने ग्राहकांकरीता उपलब्ध करणार आहेत.
ग्राहकांना 4 कोटीहून अधिक उत्पादने विक्रीसाठी असतील. उपलब्ध होणार आहेत. देशभरातील 100 शहरातील वीस हजाराहून अधिक दुकानदारांचाही या सेलमध्ये सहभाग असणार असल्याचे ऍमेझॉनने म्हटले आहे. एचडीएफसी व इतर बँकांच्या पेडिट आणि डेबिट कार्ड वर खरेदी करणाऱयांना 10 टक्केपर्यंत सवलतही मिळणार असल्याचे समजते.