आरोग्य अधिकारी डुमगोळ यांचे कौतुकोद्गार : शांताई वृद्धाश्रमतर्फे लॅब टेक्निशियनचा सत्कार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना काळ हा सर्वांसाठीच कठीण होता. उपचाराबाबत तितकीशी माहिती नसल्याने जशी माहिती उपलब्ध होईल त्याप्रमाणे उपचार करावे लागत होते. परंतु या कालावधीत प्रत्येक दिवशी 1 हजारांहून अधिक स्वॅब तपासणी कराव्या लागत होत्या. त्यामध्ये लॅब टेक्निशियननी बजाविलेली भूमिका कौतुकास्पद आहे. या सर्वांच्या प्रयत्नामुळेच जिल्हय़ातील कोरोना आटोक्मयात आला, असे गौरवोद्गार तालुका आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ यांनी काढले.
शांताई वृद्धाश्रमतर्फे बेळगाव तालुक्मयातील सरकारी हॉस्पिटलमधील लॅब टेक्निशियन कोरोना वॉरियर्सचा बुधवारी सत्कार करण्यात आला. वडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात 26 कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर वृद्धाश्रमचे व्यवस्थापक नागेश चौगुले, लेकव्हय़ू हॉस्पिटलचे डॉ. शशीकांत कुलगोड, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, संतोष दरेकर, शांताईचे संतोष ममदापूर, आलन मोरे, वसंत बालिगा यासह इतर उपस्थित होते.
विजय मोरे म्हणाले, एक काळ असा होता, आपल्या कुटुंबातील व्यक्ती दगावली तरी त्याच्याजवळही जाण्यास कोण तयार नव्हते. अशा काळात लॅब टेक्निशियननी स्वॅब, रक्ताची तपासणी सुरू ठेवली. तालुक्मयातील 26 पैकी 13 टेक्निशियनना कोरोना झाला तरी त्यांनी आराम घेऊन पुन्हा सेवा सुरू केली. त्यामुळे पोलीस, डॉक्टर यांच्यासोबतच टेक्निशियनदेखील कोरोना योद्धा असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले. डॉ. शशीकांत कुलगोड म्हणाले, कोरोना काळात सेवा देणाऱयांचे विशेष कौतुक करायला हवे. जीवाची पर्वा न करता लोकांचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न येत्या काळासाठी प्रेरणादायी ठरतील, असे विचार त्यांनी मांडले. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. प्रतिमा इंगळे यांनी ईशस्तवन सादर केले. संतोष ममदापूर यांनी शांताई वृद्धाश्रमबाबत माहिती दिली. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन कोरोना योद्धय़ांचा गौरव करण्यात आला. विजय मोरे यांनी आभार मानले. यावेळी शांताईचे सदस्य व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.