प्रतिनिधी/ मडगाव
कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मदतीचा हात द्यावा अशी हाक मारली आहे. त्याला अनुसरून कोकण रेल्वेने आपल्या सीआरएस फंडातून 1,06,00,000 रू.ची मदत केली आहे. तर कर्मचाऱयांच्या एक दिवसाच्या वेतनातून सुमारे 79,50,000रू.ची मदत केली आहे.
कोकण रेल्वेने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. सामाजिक बांधिकली जोपासताना कोकण रेल्वेने देखील प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे.