डर्बी : सध्या पाकिस्तानचा क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. पाक संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि तो निर्दोष असल्याने त्याला पाक संघात दाखल होण्यास परवानगी देण्यात आली आहे. पाक संघ इंग्लंडमध्ये या मालिकेसाठी दाखल झाल्यानंतर या संघातील सर्व खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मोहम्मद आमीरची यापूर्वी दोन वेळा कोरोना चाचणी घेण्यात आली होती आणि ती निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. 24 जुलै रोजी मोहम्मद आमीर लाहोरहून इंग्लंडमध्ये दाखल झाला होता.
नेमबाजी प्रशिक्षकाला कोरोनाची बाधा
नवी दिल्ली : येथील डॉ. कर्नी सिंग शूटिंग रेंजमध्ये कार्यरत असलेल्या नेमबाजी प्रशिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले. सदर माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) प्रवक्त्याने दिली आहे. ही महिला नेमबाजी प्रशिक्षक गेल्या काही दिवसांपासून येथे नेमबाजांना प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत होती. गुरुवारी तिची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. 8 जुलैपासून डॉ. कर्नी सिंग शूटिंग रेंज नेमबाजीसाठी खुले करण्यात आले होते. या महिला नेमबाजी प्रशिक्षकाने 24 जुलै रोजी या केंद्रातील मध्यवर्ती प्रशासकीय विभागाला भेट दिली होती. त्यानंतर तिला एका स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे.
कोरोना संकटामुळे या स्टेडियममध्ये सुरक्षेचे उपाय म्हणून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्टपासून या नेमबाजी केंद्रामध्ये 34 भारतीय नेमबाज प्रशिक्षणासाठी दाखल होत आहेत. कोरोनाची लागण झालेली महिला नेमबाजाचे नाव मात्र उघड करण्यात आलेले नाही.
त्यानंतर ब्रिटिश शासनाच्या कोरोनासंदर्भातील नियमावलीमुळे त्याला पाच दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. मोहम्मद आमीरने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती घेतली आहे. आता तो इंग्लंड विरुद्ध होणाऱया टी-20 च्या तीन सामन्यांच्या मालिकेत पाक संघाचे प्रतिनिधित्व करेल. पाक संघाच्या इंग्लंड दौऱयाला 5 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. पाक संघातील आणखी एक वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ हा कोरोना चाचणीत निर्दोष ठरल्याने त्याला पाक संघात दाखल होण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.