वृत्तसंस्था/ कोलकाता
कोरोना चाचणीसाठी एक कोटी रिअल टाइम किटची निर्मिती केल्याचा दावा दक्षिण 24 परगणा जिल्हय़ातील खासगी कंपनी जीसीसी बायोटेक इंडियनने केला आहे,अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजा मजूमदार यांनी सोमवारी दिली. एका किटची किंमत 500 रूपये आहे. 90 मिनिटांमध्ये चाचणी अहवाल
प्राप्त होतो. या किटला 1 मे रोजी ‘आयसीएमआर’ची मान्यता मिळाली. कंपनीच्या प्रयत्नामुळे यापुढे देशात दररोज 3 लाख चाचण्या होतील, असा विश्वासही मजुमदार यांनी व्यक्त केला.