वाढत्या प्रादुर्भावामळे डय़ुटीवरून सुटल्यानंतर घरी जाण्य़ास भीती
प्रतिनिधी / फोंडा
लॉकडाऊनमुळे सध्या राज्यातील सर्वच पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये व्यस्त आहेत. चेकनाक्यावर डय़ुटी बजावत असलेल्या अनेकांना कोरोना संसर्गच्या भीतीमुळे पोलिसांनी डयुटी संपल्यानंतरही थेट घरी न जाता दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना आपल्या कुटूंबियांसोबत राहता येत नसल्य़ाच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
कुळे पोलिस स्थानकावर कार्यरत असलेले पोलिसांनी एका कोरोना संशयितांना हातळताना त्याच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामध्ये एक उपनिरीक्षक, हवालदार, कोन्स्टेबल, महिला पोलिस व होमगार्डाचा समावेश आहे. त्यामुळे तातडीने आपली कोरोना चाचणी करण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी शनिवारी उपजिल्हा इस्पितळात त्यांनी चाचणी करण्यासाठी धडकले असता दुसऱया दिवशी येण्याचे फर्मानविण्यात आले. त्यामुळे हताश झालेल्या पोलिसांनी आपल्या घरी न जाता संबंधित पोलिस स्थानक, आऊट पोस्ट, तसेच इतर सुरक्षित ठिकाणी थांबा घेतला व दुसऱया दिवशी काल रविवारी उपजिल्हा इस्पितळात चाचणी करून घेतली. 15 जणांच्या टिमपैकी फक्त 4 जणांची चाचणी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे चेकपोस्टवर कोरोना संशयितांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची घरी जाण्याआधी चाचणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.