ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 1,329 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 56 हजार 665 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 741 आणि काश्मीर मधील 588 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 18 हजार 678 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 10,408 आणि काश्मीरमधील 8,270 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 37 हजार 062 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 8384 रुग्ण जम्मूतील तर 28,678 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 914 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 174 जण तर काश्मीरमधील 740 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 5 लाख 27 हजार 802 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 34 हजार 530 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 18 हजार 678 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.