ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 133 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 21 हजार 786 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 58 आणि काश्मीर मधील 75 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 2 हजार 684 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 419 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,17,211 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 48,377 रुग्ण जम्मूतील तर 68,834 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1891 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 701 जण तर काश्मीरमधील 1190 जणांनी आपला जीव गमावला आहे.