- सद्य स्थितीत 9,390 रुग्णांवर उपचार सुरू
ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढले आहे. बुधवारी 1 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा 1.41 लाखांच्या वर जावून पोहचला आहे. मागील 24 तासात 1,086 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 41 हजार 736 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 402 आणि काश्मीर मधील 684 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 9,390 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 372 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,30,304 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 52,375 रुग्ण जम्मूतील तर 77,929 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 2042 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 757 जण तर काश्मीरमधील 1285 जणांनी आपला जीव गमावला आहे.