प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना जागृतीसाठी बेळगाव ते तिरूपती असा सायकल प्रवास बेळगावमधील काही युवक करीत आहेत. एकूण 840 कि. मी. चा हा प्रवास असून, त्यामध्ये 11 तरूणांनी सहभाग घेतला आहे. आठ दिवसात दररोज 100 या प्रमाणे ते सायकल प्रवास करणार आहेत. रविवारी बेळगावच्या चन्नम्मा सर्कलपासून या सायकल यात्रेला सुरूवात झाली. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
ऍड. बसवराज ओसी यांच्या नेतृत्वाखाली ही सायकल यात्रा केली जाणार आहे. त्यामध्ये बसवराज ओसी, जोतिबा बांडवाले, बाळकृष्ण कांबळे, रमेश किळीकेत्तर, सुदाम कदम, डॉ. श्रीधर ओसी, बसवंत ओसी, अनिल ममदापुर, विठ्ठल बांडवाले, वैभव बाचूळकर, ऍड. सुनिल पाटील यांचा सहभाग आहे. या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी एम. बी. जीरली, संजय पाटील, राजू चिकनगौडर, धनंजय जाधव, धन्यकुमार पाटील, राजु बागेवाडी यांच्यासह इतर उपस्थित होते.