कोरोना होऊ नये म्हणून लोक लस टोचून घेत आहेत. तथापि, लस टोचल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग झाल्याची उदाहरणे समोर येतात. अशावेळी अशी व्यक्ती घाबरून जाणे आणि तिचा लसीवरचा विश्वास उडणे साहजिक असते. तथापि, लस घेतल्यानंतरही कोरोना का व कसा होतो? हे कोडे आता संशोधकांनी उलगडले आहे. तसेच लस घेतल्यानंतर कोरोनाची चाचणी सकारात्मक आली तरी मुळीच घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
लस घेऊनही कोरोनाची चाचणी सकारात्मक कशी येते? याचे उत्तर देताना संशोधक म्हणतात, ‘की लस रक्तात टोचली जाते. पण कोरोनाचे विषाणू श्वसन मार्गामध्ये असू शकतात. श्वसन मार्गातील काही भागांमध्ये रक्त पोहोचत नाही. परिणामी ते विषाणू तेथे जिवंत राहू शकतात. अशावेळी कोरोनाची चाचणी केल्यास ती सकारात्मक येऊ शकते. कारण चाचणीसाठी नाक व घशातून द्रव घेतला जातो. परंतु, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एक महिनाभराच्या काळात शरीरात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविके (अँटीबॉडीज) तयार होतात. त्या तयार झाल्यानंतर जेथे आवश्यकता आहे, त्याप्रमाणे प्रतिकारासाठी पोहोचतात. तेवढा वेळ आपण दक्षता बाळगणे आवश्यक असते. त्यामुळे लस घेतल्यानंतरही प्रतिजैविके पुरेशा प्रमाणात तयार होईपर्यंत मास्क व सामाजिक अंतर इत्यादी पथ्ये पाळणे आवश्यक आहे. परिणामी लस घेतल्यानंतरच्या कोरोनाला घाबरून कोणताही अशास्त्राrय किंवा सांगोवांगीच्या माहितीवरून उपाय करू नका, अशा सूचना अनेक मान्यवर संशोधकांनी केल्या आहेत.