सावंतवाडी /प्रतिनिधी-
सावंतवाडी तालुक्याचे कोरोना टेस्ट सेंटर गेल्या दीड वर्षात तीन ठिकाणी हलवण्याचा खेळखंडोबा आरोग्य प्रशासनाकडून सुरूच आहे. नेमकी या तपासणी केंद्रला निश्चित जागा मिळत नाही आहे. आता सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रवेशद्वारावरच हे तपासणी केंद्र उघडण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचा हंगाम असल्याने हे उघड्यावर केंद्र असल्याने तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत. याकडे स्थानिक आमदार दीपक केसरकर लक्ष देतील का असा सवाल नागरिकांतून होत आहे. हे तपासणी केंद्र पूर्वी भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयच्या इमारती होते. त्यानंतर पर्णकुटी विश्रामगृहावर हे हलवण्यात आले. आता हे केंद्र उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात हलविण्यात आले आहे. आता ही जागा निश्चित आहे का असा सवालही व्यक्त होत आहे.