ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मागील 24 तासात 399 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 30 हजार 200 वर पोहचली आहे. यामधील 3,468 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 602 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 16 हजार 054 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,678 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 93 लाख 92 हजार 354 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 45,116 आरटीपीसीआर टेस्ट आणि 32,484 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.