ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. दिवसभरात 1,558 नव्या कोरोना रुग्ण आढळून आले. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 55 हजार 834 वर पोहचली आहे. यामधील 6,625 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 974 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 38 हजार 212 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,997 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 43 लाख 23 हजार 094 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 59,648 आरटीपीसीआर टेस्ट आणि 32,055 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.