ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सुप्रीम कोर्टात 50 टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती ताजी असतानाच आता दिल्ली हाय कोर्टातील 3 न्यायाधिशांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची अधिकृत माहिती अजून रजिस्ट्रार जनरल कडून मिळालेली नाही. त्यामुळे या संख्येत वाढ होण्याची देखील शक्यता आहे.
- बार असोसएशनचे ऑफिस 20 एप्रिलपर्यंत बंद
बार अससिएशनने देखील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत आपले ऑफिस 20 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचे थैमान सुप्रीम कोर्टात देखील पहायला मिळत आहे. सद्य स्थितीत सुप्रीम कोर्टातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आज पासून सर्वोच्च न्यायाधीश त्यांच्या निवासस्थनातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनवसी घेतील असा निर्णय घेण्यात आला आहे. तर सुप्रीम कोर्टात सॅनिटायझिंगचे काम सुरू करण्यात आले आहे.