ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 21 हजार 821 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 299 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 02 लाख 66 हजार 674 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 48 हजार 738 एवढी आहे.
बुधवारी दिवसभरात 26,139 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 02 लाख 57 हजार 656 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 98 लाख 60 हजार 280 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 17 कोटी 20 लाख 49 हजार 274 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 27 हजार 244 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.30 डिसेंबर) एका दिवसात करण्यात आल्या.