प्रतिनिधी/ पणजी
कोरोनामुळे गत 24 तासात पिळर्ण आणि म्हापसा या भागातील दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू आलेल्यांची संख्या 705 एवढी झाली आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 96.31 टक्क्यांवर पोहोचले आहे. गुरुवार आणि शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. गत 24 तासात 70 नवे रुग्ण सापडले तर 144 जण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या सध्या 1111 एवढी आहे.
आतापर्यंत एकूण 3,69,887 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातील 49305 जण कोरोना पोझिटिव्ह सापडले. 47489 जण बरे झाले. संशयित म्हणून 40 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले आहेत. 23 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : डिचोली 20, सांखळी 29, पेडणे 14, वाळपई 23, म्हापसा 38, पणजी 46, हळदोणा 36, बेतकी 23, कांदोळी 65, कासारवर्णे 11, कोलवाळ 13, खोर्ली 20, चिंबल 28, शिवोली 37, पर्वरी 89, मये 03, कुडचडे 48, काणकोण 36, मडगाव 118, वास्को 51, बाळ्ळी 32, कासावली 40, चिंचिणी 26, कुठ्ठाळी 52, कुडतरी 12, लोटली 33, मडकई 08, केपे 52, सांगे 05, शिरोडा 15, धारबांदोडा 24, फोंडा 42, नावेली 10. त्याशिवाय हवाईमार्गे आलेले 12 बाधित सापडले आहेत.