बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा राज्यात वेगाने होणार प्रसार आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दरम्यान सीएम येडियुरप्पा, आणि जद (एस) नेते एच डी कुमारस्वामी, यांना कोरोनाची लागण झाल्याने ते बेंगळूरमधील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत भाग घेतील.
यामध्ये विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, कॉंग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार, एस. आर. पाटील, जद (एस) चे प्रदेशाध्यक्ष एच. कुमारस्वामी, जी परमेश्वरा आणि एच. डी. रेवण्णा यांच्यासह वरिष्ठ नेतेही या बैठकीला सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
राज्यपालांनी मुख्य सचिव पी. रविकुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव ई. व्ही. रमण्णा रेड्डी आणि अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य व कुटुंब कल्याण) जावेद अख्तर यांची भेट घेतली आणि साथीच्या आजाराच्या दुसर्या लहरीवर उपाय म्हणून उपाययोजनांची माहिती घेतली.
त्यानंतर राज्यपाल वला यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश वरिष्ठअधिकाऱ्यांना दिले आहेत. “यावेळी त्यांनी कोरोना ग्रस्त रूग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा, बेड आणि औषधे मिळणे” यावर लक्ष ठेवण्यास सांगितलेआहे, अशी माहिती राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.