गावठी दारूसाठी कुख्यात गावातील प्रकार
मध्यप्रदेशच्या बैतूलमध्ये कोरोनाविरोधी युद्धात महिला देखील योगदान देत ओहत. महिलांनी जनता कर्फ्यू लावत हातात काठी घेत पहारा देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. अशा स्थितीत सरकार आणि स्थानिक प्रशासन कठोर निर्णय घेत आहे. लोकांनाही स्वतःचा जीव वाचविण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत.
बैतूलमधील एका गावातील महिलांनीच गाव लॉक केले आहे. या महिला हातात काठय़ा घेऊन गावात पहारा देत आहेत. चिखलार हे गाव तसेच गावठी दारूसाठी कुख्यात राहिले आहे. पण यंदा तेथील मिहलांनी याला लॉक करत चर्चेत आणले आहे. महिलांनी गावाबाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
एवढेच नाही तर गावाजवळून जाणाऱया राज्य महामार्गावर ये-जा करणाऱयांवरही त्यांची नजर आहे. महिलांनी हातात काठी घेत गावातील सर्व सीमा बांबूच्या बॅरिकेडने बंद केल्या आहेत.
गावात कुणी प्रवेश करू नये यासाठी महिला दिवसभर पहारा देतात. याचबरोबर विनाकारण फिरणाऱयांना काठीचा मार देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. याच प्रयत्नांमुळे गावात अद्याप एकालाही कोरोनाची लागण झालेली नाही.