तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी कलादगी यांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोविड-19 रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे कोविड नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येण्याची गरज सध्या ग्रामीण भागात आहे. तालुका पंचायत कार्यक्षेत्रात सुरू असणारे नूतन ग्राम पंचायत सदस्यांचे प्रशिक्षणही बंद करण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. तेंव्हा सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करा, असे तालुका पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱयांनी सर्व ग्राम पंचायत पिडीओ व कर्मचाऱयांना सूचना केल्या आहेत.
सध्या ग्रामीण भागात काही प्रमाणात कोरोना महामारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मास्क व सुरक्षित अंतर न पाळणाऱयांना कारवाई करून 100 रुपयांचा दंड लावा. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले आहे. नियम तोडणाऱयांवर मार्शल पथके लक्ष ठेवणार आहेत. मात्र त्यांच्यावरच विसंबून न राहता ग्राम विकास अधिकाऱयांनी स्वतः यामध्ये सहभाग घेवून नियम न पाळणाऱया नागरिकांवर कारवाई करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्मयामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. कोणाचाही कोरोनाने मृत्यू होऊ नये यासाठी जनतेने कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. तेंव्हा जनतेने कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी आता अधिकाऱयांनी रस्त्यावर उतरुन कामाला लागणे गरजेचे असून त्यासाठी प्रत्येक ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात रुग्णसंख्या वाढली असून त्याला थोपविण्यासाठी आपण सर्वांनी नियमांचे पालन करून नागरिकांनाही ते नियम पाळण्यासाठी भाग पाडा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. बेळगाव तालुक्मयात महाराष्ट्राच्या सीमेवर नजर ठेवण्यात आली आहे. तीन ते चार ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनाची तपासणी करून आत प्रवेश देण्यात असून अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात आता कोणीही नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई करा, असे तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी ग्राम पंचायतींना सांगितले आहे.