ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 210 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 12 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 67 हजार 219 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. P
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 1,67,219 रुग्णांपैकी 1 लाख 58 हजार 482 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 3,361 रुग्णांवर उपचार सुरु
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 39 लाख 55 हजार 383 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 3 हजार 361 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 80 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 09 जण व्हेंटिलेटरवर आहेत.