ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये मागील 24 तासात 215 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 10 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 65 हजार 878 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 1,65,878 रुग्णांपैकी 1 लाख 56 हजार 719 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 5 हजार 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 38 लाख 56 हजार 388 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 3 हजार 837 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 78 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 17 जण व्हेंटिलेटरवर आहेत.