वार्ताहर / खोची
खोची ता. हातकणंगले गावचे उपसरपंच अमरसिंह पाटील यांनी आपला वाढदिवस कोरोना पार्श्वभूमीवर वेगळ्या पद्धतीने साजरा केला. प्रत्येक वर्षी पाटील यांच्या वाढदिवसानिमित अमरसिंह पाटील फौंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवितात. यामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपन, स्वच्छता मोहीम, माणुसकीची भिंत, आरोग्य शिबीरासह, देश भक्तीपर संस्कृतिक कार्यक्रम यासह अनेक कार्यक्रम घेतले जातात.
सध्या कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला वाढदिवस कोरोना रोगाचा मुकाबला करण्यासाठी झटणाऱ्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशास्वयंसेविका, अंगणवाडी सेविका-मदतनीस, पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचारी यांना त्यांच्या घरी जाऊन सोशल डिस्टनसिंगचा वापर करीत फुलाची झाडे देऊन त्यांचा सन्मान केला.व त्यांना कोरोना संसर्गजन्य रोगाचा मुकाबला करण्यासाठी बळ दिले.