ऑनलाईन टीम / लखनऊ :
कोरोना पॉझिटिव्ह असलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांची तब्येत बिघडली असल्याने त्यांना मंगळवारी पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाल्यावर ते होम अयसोलेशनमध्ये होते. मात्र आज तब्येत अधिक बिघडल्याने मला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली.
ते म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी माझी तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे मी माझी कोरोना टेस्ट केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मी घरीच विलगिकरणात होतो. मात्र आता तब्येत अधिक बिघडल्याने रुग्णालयात दाखल झालो आहे. आयसीयूमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचे सिटी स्कॅन, एक्सरे यासोबतच रक्त तपासणीचे नमुने देखील घेण्यात आले आहेत.
पुढे ते म्हणाले मला विश्वास आहे की, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लवकरच मी ही लढाई जिंकेन आणि प्रदेश वासियांच्या सेवेत हजर होईन.
दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी डॉ. जयलक्ष्मी शर्मा यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. डॉ. जयलक्ष्मी शर्मा या लखनऊ विद्यापीठात अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्रोफेसर म्हणून काम करतात.