प्रतिनिधी / ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी स्तर-चारचे निर्बंध लागू केले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हय़ासाठी निर्बंधांना 14 जून रोजी सकाळी सात वाजल्यापासून 21 जून रोजी सकाळी सात वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शनिवारी दिले.
शासनाकडील 10 जूनच्या आदेशानुसार साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडस् व्यापल्याची टक्केवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हय़ामध्ये कोविड बाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 11.89 टक्के असून ऑक्सिजन बेड्स व्यापल्याची टक्केवारी 51.59 टक्के इतकी आहे. सद्यस्थितीतही सिंधुदुर्ग जिल्हा स्तर-4 मध्ये असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ाला लागू करण्यात आलेल्या निर्बंध आदेशास मुदतवाढ देण्यात आली आहे.